Vadgaon Maval : एमआयडीसी मार्गावर कातवी पुलाजवळ रस्ता खचला; अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून तळेगाव (Vadgaon Maval) एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर कातवी येथे पुलाची एक बाजू खचली असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सेवा रस्त्यावर माती मिश्रित पाणी वाहत असून इथे पथदिव्यांची सोय नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक श्रीधर चव्हाणसह ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केली आहे.

वडगांव आंबी रस्त्यावरील कातवी पुलाचा पूर्वेकडील  एका बाजूचा (Vadgaon Maval) भराव कोसळून मुरुम, माती आणि खडी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. पुलावरील लोखंडी कठडे निखळल्याने रस्ता खचला आहे व माती मिश्रीत पाणी वाहत आहे. सेवा रस्त्यावर मुरुम साठून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून त्या अडचणीमुळे दुर्घटना होऊ शकते.

Pune : अजित पवार यांनी पक्षात पुन्हा परत यावे याकरिता प्रशांत जगताप यांचे खोचक ट्विट

तसेच दुस-या बाजुच्या सेवा रस्त्याची (कातवीची बाजू) खूपच दयनीय अवस्था झाली आहे.या सेवा रस्त्यांवरचे पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहने घसरून दुर्घटना होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि एमआयडीसी प्रशासनाने पुलाची आणि सेवा रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

कातवीतील अनेक नागरिक व तरूण कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला सांगूनही अजूनही प्रशासन झोपले आहे. या प्रशासनाला जागे करण्याची वेळ आता आली आहे असे माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण,ज्येष्ठ नेते पै शांतनू घुले,ॲड दीपक चव्हाण,युवा नेते वैभव पिंपळे,संतोष पिंपळे, दत्तात्रय पिंपळे आदींनी म्हटले आहे. या सेवा रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अन्यथा याविषयी जनआंदोलन करणार असल्याचेही ग्रामस्थांनी (Vadgaon Maval) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.