Pimpri : शहराच्या लौकिकाला साजेशी न्यायालयाची इमारत तयार होणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या ( Pimpri ) उभारणीबाबत  ‘‘व्हीजन- 2020 ’’  मध्ये आम्ही घोषणा केली होती. याला आता मूर्त स्वरूप आले असून पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकाला साजेशी पिंपरी चिंचवड न्यायालयाची इमारत तयार होईल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीची उभारण्याबाबत ‘‘व्हीजन- 2020 ’’ मध्ये आम्ही घोषणा केली. त्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी न्यायालयाची इमारत मोशी येथे उभारण्याच्या कामाचा प्रारुप आराखडा याचे संबंधित आर्किटेक्ट यांनी प्रोजेक्टद्वारे सादरीकरण केले.

Vadgaon Maval : एमआयडीसी मार्गावर कातवी पुलाजवळ रस्ता खचला; अपघाताचा धोका

यावेळी न्यायाधीश ॲड. आर.एस. वानखेडे, ॲड. एम. जी. मोरे, ॲड. आर. एम. गिरी, ॲड. एन. आर. गजभिये, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. मंगेश नढे, ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सतिश गोरडे, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. संजय दातीर-पाटील, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. दिनकर बारणे आणि सहकारी उपस्थित होते.

नेहरूनगर न्यायालयातील बार रूम येथे मोशी येथे होत असलेल्या प्रस्तावित नविन न्यायालयाच्या इमारतीचा आर्किटेक्ट प्लॅन डिझाईन व नविन कोर्टाचा 3 डी प्रारूप आराखडा कसा असेल याचे सदर कामासाठी नियुक्त केलेल्या आर्किटेक्ट मार्फत प्रोजेक्टवर सादरीकरण झाले. यावेळी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. त्यांनी सर्व वकील बांधवांना नवीन इमारतीबाबत ( Pimpri ) आश्वस्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.