Akurdi : आकुर्डी पीएफ कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे भविष्य निर्वाह निधी रक्कमेसाठी आंदोलन

एमपीसी न्यूज – भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अंशदानातील (Akurdi ) अनियमिता 23 ऑक्टोबर 2023 पूर्वी न झाल्यास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) राज्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पीएफ कमिशनर कार्यालय समोर आंदोलन चालू करणार, असा ईशारा आकुर्डी पीफ कार्यालय समोर आंदोलन च्या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मंगळवारी (दि.3) दिला आहे.

Pimpri : शहराच्या लौकिकाला साजेशी न्यायालयाची इमारत तयार होणार – महेश लांडगे

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे,  उप सरचिणीस राहूल,  संघटन मंत्री ऊमेश आणेराव,  कोषाध्यक्ष सागर पवार,  उमेश विस्वाद , कोथरुड विभाग अध्यक्ष वैभव कामठे, यशवंत महाडीक, रोहित कोळवणकर  यांनी केले आहे.

यावेळी संघटनेच्या म्हणण्यानुसार पुण्यातील कोथरुड विभागातील कंत्राटी कामगारांच्या टेंडर सन 2010 ते 2012  या कालावधीत आबा स्वयंरोजोगर संस्था यांनी घेतले होते. कामगारांच्या वेतना मधुन दरमहा पीएफ रक्कम वजावट करून भरण्यात आली नव्हती.

त्यामुळे संघटनेने आकुर्डी पीएफ कार्यालय मध्ये तक्रार दाखल केली होती,  मधील काळात स्वयंरोजोगर संस्थावर लिक्वीडेटर ची नियुक्ती करण्यात आली, . पण संघटनेने वारंवार पाठपुरावा करून 7 A नुसार चौकशी लावून पी एफ रक्कम बाबतीत 13 लाख 88 हजार 904 रुपये त्वरित जमा करण्या चे आदेश सहाय्यक भविष्य निर्वाह निधी कार्यालय आकुर्डी यांनी दिले होते.

संबंधित संस्थाचालक यांनी सदरील रक्कम सन 2019 मध्ये पी एफ कार्यालय मध्ये जमा केली होती.  पण जमा झालेली रक्कम अद्याप पर्यंत कामगारांच्या खात्यावर जमा केली नव्हती. त्यामुळे संघटनेने आकुर्डी पी फ कार्यालय समोर लाक्षणिक आंदोलन चालू केले होते या विषयावर वरिष्ठ 3 अधिकारी यांची नियुक्ती रिजनल  कमिशनर माने यांनी केली असून या प्रश्नाचा निपटारा 13 ऑक्टोबर  पूर्वी करून कामगारांना त्यांचे हक्कांचे पैसे खात्यामध्ये जमा केले जातील असे  पत्र पी एफ कमिशनर यांनी दिलेले आहे.  त्यामुळे बेमुदत आंदोलन स्थगित केले (Akurdi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.