Vadgaon : वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक; कातवी गावातील मंगल पिंपळे यांची उपाध्यक्ष पदी तर हरीश पिंपळे यांची तज्ज्ञ संचालक पदी निवड

एमपीसी न्यूज – वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या (Vadgaon)उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. प्रकाश कुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कातवी गावच्या मंगल सुरेश पिंपळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सोसायटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. तर कातवी गावचे युवक कार्यकर्ते हरीष पिंपळे यांची तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली. कातवी गावाला सोसायटीच्या निवडणुकीत महत्वाची पदे मिळाल्याने आनंद साजरा होत आहे.

याप्रसंगी गणेश आप्पा ढोरे,सुभाष जाधव, मंगेश काका ढोरे, निलेश म्हाळस्कर,(Vadgaon) चंद्रकांत ढोरे,पंढरीनाथ ढोरे, बाळासाहेब ढोरे,अर्जुन ढोरे, राजेंद्र चव्हाण,विशाल वहिले, राजेंद्र कुडे, प्रवीण ढोरे,राम घुले, तानाजी घुले,तानाजी पिंपळे, दादाभाऊ गायकवाड, प्रकाश कुडे,अंकुश चव्हाण, तुकाराम ढोरे, जगन्नाथ चव्हाण,विजय चव्हाण, खंडू चव्हाण,पोलीस पाटील शीतल किशोर चव्हाण,कैलास चव्हाण सर्व संचालक मंडळ कातवीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune : झेंडूच्या फुलांचे दर घसरले, आवक वाढल्यामुळे कवडीमोल भाव..

या आधीचे व्हाईस चेअरमन प्रकाश कुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या ह्या पदासाठी संस्थेचे चेअरमन किसनराव भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमनपदासाठी सर्वानुमते कातवी गावातील महिला शेतकरी मंगल पिंपळे यांना संधी देण्यात आली. आणि यापदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कातवी गावचे युवक कार्यकर्ते हरीष पिंपळे यांची तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीमुळे कातवी गावाला खऱ्या अर्थाने प्रथम न्याय मिळाल्याने आनंदोत्सव करण्यात आला. निवड प्रक्रियेचे कामकाज सहाय्यक म्हणून सचिव रमेश गाडे यांनी पाहिले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हाईस चेअरमन मंगल पिंपळे व तज्ज्ञ संचालक हरीष पिंपळे यांचा सत्कार करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.