Wakad News : विजय रन मध्ये अपंग सैनिकांसोबत धावले विद्यार्थी 

एमपीसी न्यूज –  विजय दिनानिमित्ताने नॅशनल सोशल परिवार,क्रिएटिव्ह चेंज संस्था आणि फिटीस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने (Wakad News) जवानांच्या सन्मानार्थ सोल्जरॅथॉन विजय रनचे रविवारी (दि.18) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अपंग सैनिका सोबत विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

यावेळी खडकी येथील कर्नल डॉ.रतनसिंग  मुखर्जी,पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमधील  ध्यानचंद पुरस्कार विजेते निल बहाद्दूर गुरुंग,बास्केटबॉल पट्टू सुरेश कल्की,प्रशिक्षक अमोल बोरिवाल, बॅडमिंटनपटू  प्रेमकुमार आळे, अविनाश मोरे,नॅशनल सोशल परिवारचे प्रमुख अनिल मित्तल,कैलाश पारीख हे उपस्थित होते.

या रन मध्ये 3 किमी अंतर अपंग सैनिकांसोबत विद्यार्थी धावले. काहींनी सायकलिंग केली. तंदुरुस्त भारत आणि जवानांच्या सन्मानार्थ हा उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

या रन मध्ये महाराष्ट्र सिव्हिल फोर्सचे 25 जवान आणि ज्ञान प्रबोधिनीच्या क्रीडा कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमातून जमा झालेला निधी हा जवानांच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरला देण्यात आला.

Talegaon Dabhade : सृजन नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमीत्त चार दिवसीय नृत्य महोत्सवाचे आयोजन

या कार्यक्रमाचे आयोजन क्रिएटिव्ह चेंजच्या प्रमुख कानन पटेल, (Wakad News) निता मित्तल,मृणाल पाटील, श्वेता बोरा यांनी केले होते. सूत्रसंचालन अतुल शिंदे यांनी केले.आकाश शेट्टी, किरण संघवी,ओम करोकर, नंदू शिंदे,आनंद पटेल,रत्नप्रभा पाटील, यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी कर्नल डॉ. मुखर्जी म्हणाले कि, देशसेवा फक्त सैनिकच करतात असे नाही तर बाकीच्या क्षेत्रातील नागरिक देखील आपल्या परिने वेगवेगळ्या कार्यातून देशसेवा करीत असतात. यामुळे देशसेवा करण्यात समाजातील काही नागरीकांचे योगदान आहे. हि दौड 1971 साली मिळालेल्या विजय दिनाचे स्मरण करण्यासाठी केली जाते. आमचे फौजी अपंग असून देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त करून एक देशसेवेचे कार्य अखंडित करीत आहेत. हि बाब आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देश सुरक्षित ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.स्वस्थ रहा,फिट रहा,सुखी रहा, अशी त्रिसूत्री सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.