Pune News : अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारपासून सुरु

एमपीसी न्यूज – हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune News) ही स्पर्धा 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. अशी माहिती संयोजन सचिव उदय साने यांनी दिली.

स्पर्धेचे यंदा 13 वे वर्षे आहे. या स्पर्धेला सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने पारितोषिके देण्यात येणार असून कॉर्पोरेट अॅथलीट आणि योनेक्स सनराई़ज हे या स्पर्धेचे सह प्रायोजक आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा ड्रॉ 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

Wakad News : विजय रन मध्ये अपंग सैनिकांसोबत धावले विद्यार्थी 

कोरोना नंतर दोन वर्षांनी ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे या वेळी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ही स्पर्धा 11, 13, 15, 17, 19 वर्षांखालील मुले-मुली एकेरी,(Pune News) दुहेरी गटात होणार आहे. त्यानंतर पुरुष, महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही मोठी स्पर्धा असणार आहे. 35, 40, 45, 50, 55, 60 वर्षांवरील गटातही ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत एकूण 1 हजार 300 हून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. स्पर्धेसाठी एकूण 3 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला 50 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. आज पर्यंत आयोजकांकडून 11 खेळाडूंना अशी स्कॉलरशिप देण्यात आली आहे, आणि सर्व स्कॉलरशिप मिळालेल्या खेळाडूंनी  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.