Talegaon Dabhade : सृजन नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त चार दिवसीय नृत्य महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – सृजन नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त एका भव्य नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 24 ते 28 डिसेंबर या चार दिवसांच्या (Talegaon Dabhade) कालावधी हा महोत्सव कलापिनी सांस्कृतिक केंद्र  या ठिकाणी रोज संध्याकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.

महोत्सवाचे उद्द्घाटन 24 डिसेंबर रोजी होणार असून  यासाठी आदरणीय गुरु डॉ. स्वातीताई दैठणकर  ( संगीताचार्य भरतनाट्यम् ) , प्रसिद्ध चित्रकार रवी देव  ( संस्कार भारतीचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य ), डॉ. लक्ष्मी पंडीतधर (Ph. D  भरतनाट्यम् )  तसेच कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे व सा. अंबरचे संपादक सुरेश साखवळकर हे ही या प्रसंगी उपस्थित रहाणार आहेत. तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याची आवड रुजावी या साठी गेली 25 हून अधिक वर्षे  सृजन नृत्यालय कार्यरत आहे.

या नृत्य महोत्सवात तळेगाव बरोबरच आंबी, वराळे , वडगाव, कान्हे, कामशेत,  इंदुरी , नवालाखउंब्रे, धामणे , सोमाटणे अशा ग्रामीण भागातील विद्यार्थीनी , तसेच गायक , वादक व नाट्य कलाकार असे 250 हुन अधिक कलाकार  सहभागी होणार आहेत. (Talegaon Dabhade) या महोत्सवात भरतनाट्यम् नृत्य शैलीतील पारंपरिक रचनांबरोबर काही प्रयोगशील रचना, हिंदुस्थानी  संगीतावर आधारित काही उपशास्त्रीय रचना ,स्तोत्र , अभंग , कविता , नाट्यगीत , अशा वैविध्य पूर्ण नृत्य रचना सादर होणार आहेत.

 

Thergaon News : कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, नर्सचे पगारासाठी कामबंद आंदोलन  

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. 24 डिसेंबर ला  प्रदर्शनीचे उद्घाटन , हस्तलिखिताचे व अंबर च्या विशेष पुरवणीचे प्रकाशन व काही नृत्य रचनांचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. 25 डिसेंबर ला “मंथन ” या कार्यक्रमात  भरतनाट्यम् मधील काही पारंपरिक व काही प्रयोगशील रचनांचे सादरीकरण होणार आहे. तिसऱ्या दिवशी  दि. 26 डिसेंबर ला ” नृत्यं वंदे ” हा कार्यक्रम  सादर होणार असुन  यात सृजन नृत्यालय निर्मित विविध  प्रकारच्या कार्यक्रमांमधील  निवडक नृत्य रचना सादर होणार आहेत.

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी  दि. 27 डिसेंबर ला 110 कलाकारांचे  “दुर्गा   झाली गौरी ” हे भव्य नृत्य नाट्य नवीन नृत्य रचना व नवीन दिग्दर्शनासहीत सादर होणार आहे तर शेवटच्या दिवशी  म्हणजे  दि, 28 डिसेंबर ला कलापिनी निर्मित व सृजन नृत्यालय प्रस्तुत ” भाग्ये देखिला तुका ” हे  जगद् गुरु संत तुकाराम महाराजांवरील  दोन अंकी नृत्य नाट्य सादर होणार आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी असून याला कोणतेही तिकीट किंवा प्रवेशिका नाहीत. तरी सर्व रसिकांनी, नृत्याच्या व संगीताच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या महोत्सवाचा लाभ घ्यावा (Talegaon Dabhade) असे आवाहन सृजन नृत्यालयाच्या संस्थापिका व संचालिका डॉ.सौ. मीनल कुलकर्णी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.