Thergaon News : कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, नर्सचे पगारासाठी कामबंद आंदोलन  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, स्टाफनर्स यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्यापही झाला नाही. (Thergaon News) दिवाळी बोनसही दिला नाही. पगाराबाबत ठेकेदाराकडून दररोज वेगवेगळ्या तारखा दिल्या जात असल्याचा आरोप करत डॉक्टर, स्टाफ नर्ससह विविध 270 कर्मचा-यांनी आज (सोमवारी) सकाळी काही वेळ आणि दुपारी ओपीडी बंद झाल्यानंतर जोरदार आंदोलन केले.

महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेत डॉक्टर, स्टाफनर्स यांना मानधनावर घेतले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सर्वांचा विरोध डावलून विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या रूग्णालयात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी घेण्यात आले, मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची समस्या सुरुवातीपासूनच सुरु झाली. तीन-तीन महिने ठेकेदारांकडून पगार दिला जात नाही.

Crime News : फुकट कपड्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ महिलेला लुटले

हक्काच्या कामाचा पगार मिळविण्यासाठी डॉक्टर, नर्स यांना वारंवार काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.   त्यानंतर थकित पगार दिला जातो. पुन्हा पगार थकविला जातो. याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने  केली. दर तीन महिन्यांनी कर्मचा-यांना पगारासाठी आंदोलन करावे लागते. (Thergaon News) तरी, देखील परिस्थिती बदलत नाही. नवीन थेरगाव कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, नर्स यांचा मागील नोव्हेंबर महिन्यांचा पगार अद्यापही झाला नाही. त्यामुळे  या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. सकाळी दहा वाजता काही वेळ आंदोलन केले. रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी आंदोलन स्थगित करून काम सुरू केले. पुन्हा दुपारी ओपीडी  बंद झाल्यानंतर जोरदार आंदोलन केले.

थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार म्हणाले, “पगार मिळाला नसल्याने कंत्राटी डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले. (Thergaon News) त्याचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली होती”. तर, वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”महापालिका रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या कर्मचा-यांचा पगार देण्याबाबत संबंधित ठेकेदार एजन्सीला सूचना दिल्या आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.