Vinayak Aundhkar : विट्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर लाच घेताना रंगेहाथ सापडले

एमपीसी न्यूज-विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी  विनायक औंधकर यांना बांधकाम ठेकेदाराकडून इमारत बांधकाम परवानगीसाठी अडीच लाख रुपयांची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले (Vinayak Aundhkar ) आहे.पूर्वी ते पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे मुख्याधिकारीपदी होते. 

तीन महिन्यांपूर्वीच विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी विनायक औंधकर यांची नियुक्ती झाली होती. विटा शहरातील एका ठेकेदाराकडे त्यांनी एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

Pune : ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या कार्यक्रमाचे २१ मे रोजी आयोजन 

तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून आपल्याकडे लाच मागितली जातेय अशी माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई (Vinayak Aundhkar ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.