Pune : ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या कार्यक्रमाचे 21 मे रोजी आयोजन 

एमपीसी न्यूज – नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर आणि कथकनाद संस्थेच्या वतीने येत्या रविवारी (21 मे) पुण्यात कोथरूड येथे मयूर कॉलनी मधील एमईएस बालशिक्षण सभागृहात (Pune) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.   
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने होईल. विराज हे आपले वडील व गुरु श्रीनिवास जोशी यांकडून संगीताचे शिक्षण घेत असून किराणा घराण्याच्या नव्या पिढीचे आश्वासक गायक आहेत. यानंतर शुभम उगळे यांचे पखवाज वादन होईल. गोविंद भिलारे आणि पं योगेश समसी यांचे शिष्य आहेत.

कार्यक्रमाचा समारोप सुप्रसिद्ध कथक (Pune) नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या शिष्यांच्या कथक नृत्य सादरीकरणाने होईल. कार्यक्रमात गायक सुरंजन खंडाळकर यांचे विशेष सादरीकरण देखील होणार आहे.
कार्यक्रमामध्ये पांडुरंग पवार तबल अपूर्व पेटकर संवादिनी हे साथसंगत करतील तर आनंद देशमुख हे कार्यक्रमाचे निवेदन करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.