Wakad : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून नागरिकाला बेदम मारहाण, मारहाणीत नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – शिवीगाळ केल्यामुळे एका 40 वर्षीय नागरिकाला (Wakad) लाथा –बुक्क्यांनी मारहाण केली होती. यामध्ये जखमी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर वाकड पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार 2 डिसेंबर रोजी काळेवाडी फाटा येथे घडला होता.

योगेश जगन्नाथ सुर्वे (वय 40 रा. रहाटणी) असे मयत इसमाचे नाव असून वाक़ड पोलिसांनी अनिकेत उर्फ सनी रमेश काळे (वय 28 रा.मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई भास्कर किसन भारती यांनी वाकड पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे.

Maharashtra : चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताला आरोपीने 2 डिसेंबर रोजी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली (Wakad) होती. यावेळी मयताचा शवविच्छेदनाच्या अहवालात पोटातील आतड्यांना जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

यावरून वाकड पोलिसांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.