Wakad : ऑनलाईन व्यवहारातून व्यावसायिकाची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन व्यवहार व एटीएमद्वारे एका व्यावसायिकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 14 व 15 ऑक्‍टोबर दरम्यान घडला आहे.

भरत महादेव कुंभार (वय 39, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार यांच्याकडे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड आहे. त्याद्वारे त्यांनी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. तरी देखील अचानक त्यांच्या खात्यातून ऑनालाईन व्यवहार व एटीएमद्वारे दोन दिवसात 1 लाख 40 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.