Wakad : बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून महिलेची 40 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एसबीआय बँकेच्या पुणे हेड ऑफिसमधून बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगून महिलेकडून बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे ऑनलाईन खरेदी करून महिलेची 39 हजार 998 रुपयांची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.

मोनिका अनुराग वर्मा (वय 42, रा. अलाईट सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 91-6370160288 या क्रमांकावरून फिर्यादी मोनिका यांना 15 जानेवारी 2019 रोजी दुपारी बाराच्या सुमारास फोन केला. आरोपीने एसबीआय बँकेच्या पुणे हेड ऑफिसमधून बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले.

आरोपीने मोनिका यांच्याकडून डेबिट कार्ड आणि बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे आरोपीने CITRUSPAY SPICESAFAR या साईटवरून 39 हजार 998 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.