Wakad : गाडी पार्किंगचा हप्ता मागत गाडी जाळून टाकण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज – गाडी चालकाला (Wakad) गाडी पार्किंग करायची असेल तर महिना हजार रुपये हप्ता दे नाही, तर गाडीसह तुलाही जाळून टाकेन अशी धमकी देण्यात आली. हा प्रकार गुरुवारी (दि.29) संध्याकाळी वाकड येथे वाकड ब्रीज जवळ घडला आहे.

याप्रकरणी सुंदर शिवशरण पाचवेकर (वय 30, रा.ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून सचिन पवार, अरविंद शिर्के, अभिषेक गावडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

PCMC : सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रबोधन पर्व

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची इर्टिगा कार (एमएच 43 ए.टी.1125) वाकड ब्रीज जवळील सर्व्हिस रोजवर गाडी पार्क करून तेथील टपरीवर चहा पीत असताना आरोपी जवळ आले व त्यांनी फिर्यादीला तुला तुझी गाडी येथे पार्क करायची असेल तर तू आम्हाला महिना हजार रुपये हप्ता दे. यावेळी फिर्यादीने नकार दिला. यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हप्ता दिला नाही, तर गाडीसह तुलापण जाळून टाकू अशी धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Wakad) आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.