Chinchwad : यश मिळेपर्यंत प्रयत्नांची कास सोडू नका !- संजीव पेंढरकर

'बीबीएन'च्या कार्यक्रमात व्यवसायासाठी मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- उद्योजक आणि व्यावसायिक व्हा, यश मिळणारच. मात्र यश मिळेपर्यंत प्रयत्नांची कास सोडू नका, या शब्दांत विको लॅबोरटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी व्यावसायिक आणि उद्योजकांना मार्गदशन केले. ‘बीबीएन पीसीएमसी’ या व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी संघटना ‘बीबीएन पीसीएमसी’ या व्यावसायिकांच्या संघटनेने आपल्या 250 व्या साप्ताहिक बैठकीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राम साठ्ये उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर बीबीएनचे जितेंद्र कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, विष्णू नायगावकर, उत्कर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी पेंढरकर यांनी ‘विको’ कंपनीला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनविताना आलेल्या अडचणी आणि केलेल्या प्रयत्नांची अतिशय रोचक पद्धतीने माहिती दिली. तसेच उपस्थित व्यावसायिक व उद्योजकांना आपल्या मिश्किल भाषणांमधून व्यवसायाचे कित्येक गुरुमंत्र दिले. तसेच जोखिम घेण्याची क्षमता वाढविण्याचा सल्ला दिला.

जितेंद्र कुलकर्णी म्हणाले, “व्यावसायिक आणि उद्योजक होण्यासाठी आपल्या मागे बांधलेले बंध तोडून टाका. फक्‍त व्यावसायिक होण्याचा निश्‍चय करा, व्यवसाय आम्ही घडवून आणू” असे आवाहन केले. तसेच केवळ बीबीएनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिकांनी गेल्या तीन वर्षांमध्ये 15 कोटींचा व्यवसाय केल्याची माहिती दिली.

बीबीएनच्या नितीन कुलकर्णी यांनी देशभरात पसरत असलेल्या बीबीएनच्या शाखांबद्दल माहिती दिली व पिंपरी-चिंचवड शाखेस शुभेच्छा दिल्या.
राम साठ्ये यांनी मनाचे व्यवस्थापन या विषयावर आपल्या अमोघ वाणीतून तब्बल 90 मिनिटे मार्गदर्शन करत उपस्थितांना खिळवून ठेवले.

या कार्यक्रमासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथून अमोल देशपांडे, योगेश कोतेकर, उमेश जोशी, हर्षल देशपांडे, सुनील कोटीभास्कर आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधवी हुल्याळ, रवी कुलकर्णी, मंगेश टोणगावकर, सचिन गटणे, अनया देशपांडे, वैशाली पावनस्कर, शेफाली खळे, स्मिता देशपांडे, स्वाती जोशी, मेधा गुर्जर, जागृती कुलकर्णी, अपूर्वा बेलवलकर, डॉ. दीपाली टोणगावकर, मिलिंद कुलकर्णी, हेमंत मोघे, विनायक कुलकर्णी, गणेश टाकसाळे, प्रसन्न जोशी, शिल्पा धामनस्कर, डी.बी.जोशी, अभय भिसे, पराग बेलवलकर, नितिन आवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.