Pune : राष्ट्रीय रुबीक क्युब स्पर्धेत पुण्यातील मुलांचे यश

गंगाधाम जिनियस अ‍ॅकॅडमीमधील रचित, अंशुल, प्रयाण अव्वल
एमपीसी न्यूज – राष्ट्रीय रुबीक क्युब स्पर्धेत पुण्याच्या 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत यशस्वी कामगिरी केली. पुण्यातील गंगाधाम जिनीअस किड अ‍ॅकॅडमीचा रचित भटेवरा, अंशुल जाधव, प्रयाण मुथा हे आपापल्या गटात अव्वल ठरले. मुंबई मधील घाटकोपर येथे ही स्पर्धा झाली. देशभरातील 1200 हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. 
अ‍ॅकॅडमीच्या संचालिका नेहा गुजर आणि शलाका केरींग यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. कनिष्ठ गट, वरिष्ठ गट आणि खुल्या गटात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांना मेरीट मेडल मिळाले, तर तीन विदयार्थ्यांनी चॅम्पियन चषक पटकाविले
नेहा गुजर म्हणाल्या, स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केली होती. त्याचप्रमाणे त्यांना यश मिळाले आहे. रचित भटेवरा याने कनिष्ठ गटात 7 सेकंदात पिरॅमिड क्युब सोडवित प्रथम पारितोषिक मिळविले.  अंशुल जाधव याने 3 बाय 3 चा क्युब 27 सेकंदात सोडवित विजेतेपद पटकाविले. तर प्रयाण मुथा याने 4 ते 6 वयोगटात 24 सेकंदात पिरॅमिड क्युब सोडवित प्रथम उत्तेजनार्थचे पारितोषिक पटकाविले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.