महिलांना प्लॉट खरेदीवर 100 रुपये प्रति चौ. फूट इतकी भरघोस सूट

जागतिक महिला दिनानिमित्त एक्सलन्स शेल्टर्सची विशेष योजना


एमपीसी न्यूज – आता खरेदी करा आपल्या कुटुंबातील महिला सदस्याच्या नावाने प्लॉट आणि त्यावर मिळवा 100 रु. पर स्क्वेअर फूट इतकी भरघोस सूट!

आपल्याला जगात आणणारी स्त्री असते, घडवणारी स्त्री असते. बळ देणारीही स्त्रीच असते आणि कौतुकाची थाप देणारीही स्त्रीच असते. तशी तिची रुपे अनंत असतात. कधी आई, कधी पत्नी तर कधी कन्या आणि बहीण म्हणून तिचे आपल्या आयुष्यातील स्थान अनन्यसाधारण असते. याच आई, पत्नी, बहीण आणि मुलीचा सन्मान या महिलादिनाच्या निमित्ताने तुम्ही वेगळ्या प्रकारे करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला साथ द्यायला पुढे आले आहे एक्सलन्स शेल्टर्स ग्रुप.

एक्सलन्स शेल्टर्सतर्फे महिलादिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी बिगरशेती रहिवासी (एनए रेसिडेन्शियल)  प्लॉटच्या खरेदीवर भरघोस अशी 100 रु. पर स्क्वेअर फूट सवलत जाहीर करण्यात आली आहे. एक्सलन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या संस्थापक सदस्या रेश्मा हजिते यांनी आठ मार्च या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने पुणे, मुंबई व सोलापूर येथील  एक्सलन्स शेल्टर्सच्या विविध प्रकल्पामधील  बिगरशेती रहिवासी (एनए रेसिडेन्शियल) प्लॉटच्या खरेदीवर घसघशीत सूट जाहीर केली आहे. यात आपल्या परिवारातील आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी यांच्यापैकी कोणत्याही महिलेच्या नावावर प्लॉट खरेदी केल्यास त्यावर प्रत्येक स्क्वेअर फुटाला 100 रुपये एवढी भरघोस सूट मिळणार आहे.

महिलादिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या या ऑफरमध्ये 4 ते 6 मार्च दरम्यान जर आपण एक्सलन्स शेल्टर्सच्या कोणत्याही प्रकल्पात महिलेच्या नावाने गुंतवणूक केल्यास 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट  फक्त नऊ  लाखात उपलब्ध होईल. यासाठी 88883 55559  या दूरध्वनी क्रमांकावर फोन करावा अथवा 74472 95005 या क्रमांकावर मिसकॉल द्यावा.

एक्सलन्स शेल्टर्सच्या वतीने एक्सलन्स सेलिब्रेशन्स हा प्रकल्प मुंबईजवळ कर्जत येथे आकाराला येत आहे. तसेच सोलापूर येथील नियोजित कार्गो एअरपोर्टजवळ एक्सलन्स झेन गार्डन हा प्रकल्प साकारला आहे. आणि शिरवळजवळ निसर्गसृष्टी हा निसर्गरम्य ठिकाणी वसलेला प्रकल्प सुरु होत आहे. प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य वेगळे आणि सुविधा वेगळ्या.

एक्सलन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या संस्थापक सदस्या रेश्मा हजिते यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात ऑनलाईन प्लॉट बुकींगची अभिनव योजना पहिल्यांदाच सुरू केली. तसेच रेश्मा हजिते यांच्याच प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कंपनीचे विविध प्रकल्प सध्या सुरू आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा वेगवेगळ्या प्रकारे एक्सलन्स शेल्टर्सचे विविध प्रकल्प सध्या जोमाने सुरू आहेत. दुबई, सिंगापूर, अमेरिका या बरोबरच आता इंग्लंड, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया येथे देखील नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

रेश्मा हजिते यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पर्पल काउंटी या प्रकल्पाला 5 स्टार रेटींग मिळाले असून त्यांना नुकताच रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 चा पुरस्कार मिळाला असून त्यानिमित्त त्यांना अभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते गौरवण्यात आले. रेश्मा हजिते या एक्सलन्स ध्यास फाउंडेशनच्या उपाध्यक्ष देखील आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्या अनेक उपक्रम राबवत असतात. तसेच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणातून त्या महिला आणि मुलांच्या  समस्यांना वाचा फोडत असतात.

रेश्मा हजिते यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यात रयत गौरव पुरस्कार, माउली पुरस्कार व अभिव्यक्ती पुरस्कारांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.