Akurdi : एस.बी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. तर शास्त्र शाखेचा निकाल 99 टक्के लागला आहे.

वाणिज्य शाखेतून या वर्षी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेले सर्व 96 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर शास्त्र शाखेसाठी 188 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य विभागाच्या आकाश महेंद्र भुजंग (87.69 %), पौर्णिमा रविंद्र आरगडे (84 %), स्टेफी सायमन शेट्टी (82 %) आणि शास्त्र शाखेचे कविता सत्यवान साहू (89.3 %), स्नेहा संजय पाटील (78 %), प्रतिक निरज आगरवाल (77 %) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी यशस्वी विद्यार्थी व मुख्याध्यापक संदीप पाटील यांचे अभिनंदन केले. सचिव व्ही.एस. काळभोर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, एस.बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, लेखाधिकारी सुभाष कानिटकर, कार्यालय अधीक्षक आदित्य उपासनी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.