Pune : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम

एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयाचा उपक्रम

एमपीसी न्यूज- ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’ निमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयातर्फे जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. 25 मे ते 31 मे अखेर तंबाखूविरोधी जनजागरण सप्ताह साजरा करण्यात आला. व्याख्याने,विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी (दि. ३१)या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे रजिस्ट्रार ए आर शेख अध्यक्षस्थानी होते. डॉ. अमिता आदित्य, डॉ. रेणुका नगराळे यांनी तंबाखू, आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विनोद व्ही.सी. यांनी रंगूनवाला दंत महाविद्यालयातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याची माहिती दिली. जनजागृती उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.