Pune : बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज – आझम कॅम्पस मधील शैक्षणिक संस्था (Pune) आणि मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँक मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सलीम बागवान यांनी पत्रकार परिषद घेवून केलेला आरोप हा तद्दन खोटा असून संबंधितांच्या नैराश्यातून हा खुळेपणा आलेला आहे, असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ पी ए इनामदार यांनी आज सायंकाळी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

सलीम बागवान आणि काही असंतुष्ट व्यक्तींनी पत्रकार परिषद घेवून तद्दन खोटे, बदनामीकारक आरोप केले आहेत. बँकेच्या निवडणुकीदरम्यान आमच्या पॅनलच्या (Pune) विजयामुळे चिडून असलेले बागवान सोशल मीडिया तसेच पत्रकार परिषद माध्यम वापरून संस्था, बँक तसेच मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना आम्ही डिफेमेशन (बदनामीच्या खटल्या ची) नोटीस पाठवली आहे. कायदेशीर कारवाई करणार आहोत.

Pimpri : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या कन्येमुळे महाराष्ट्राची कांस्यपदकावर मोहोर

 

‘वैयक्तिक पातळीवर तसेच संस्था पातळीवर कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शैक्षणिक, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रात पुण्या सारख्या प्रतिष्ठित शहरात पन्नास वर्षे आम्ही कार्यरत आहोत. लाखो गरीब, मागास विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीकडे नेत असताना शेकडो व्यक्तींचे हित संबंध दुखावले जातात. ज्यांना संस्थेत, बँकेच्या निवडणुकीत विजय मिळत नाही, कोणतीही पदे मिळत नाहीत, अशी मंडळी निंदा नालस्ती करण्याचा प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांना कायदेशीर उत्तर दिले जाईल ‘, असेही डॉ पी ए इनामदार यांनी म्हटले आहे

 

सार्वजनिक आयुष्यात आम्ही एकही चुकीचे काम केलेले नाही, कारण वैयक्तिक लाभासाठी सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या नसून सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारल्या आहेत. त्यामुळे 2 हजार विद्यार्थ्यांचा हा कॅम्पस 30 हजार विद्यार्थ्याचे माहेरघर बनला आहे. मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेनेही सभासद, पुणे शहर, आणि देशावर आलेल्या प्रत्येक संकटात धावून जात योगदान दिले आहे. बँकिंग क्षेत्राची पडझड होत असताना मुस्लीम बँक सतत प्रगतीपथावर राहिली आहे, आणि विविध पुरस्कार मिळवून चांगला कारभार करीत आहे, पन्नास वर्षे संचालक, अध्यक्षपदावर राहून पाच रुपयाचेही कर्ज घेतलेले नाही, असेही डॉ इनामदार यांनी म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.