१२ मे : दिनविशेष

१२ मे – महत्वाच्या घटना

  • १३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
  • १५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
  • १६६६: आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
  • १७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
  • १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
  • १९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.
  • १९५२: प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
  • १९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
  • १९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
  • १९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
  • १९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
  • १९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
  • २००८: चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.
  • २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१२ मे – जन्म

  • १८२०: परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)
  • १८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)
  • १८९९: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००२)
  • १९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)
  • १९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)
  • १९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)

१२ मे – मृत्यू

  • १९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९१)
  • २०१०: लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन.
  • २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.