Pimpri : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे रविवारी सरकारी रुग्णालये, उद्यानांची साफसफाई

एमपीसी न्यूज- संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या देश पातळीवरील विशाल स्वच्छता अभियानात आता पुणे जिल्हयातील 35 सरकारी रुग्णालये, उद्याने चकाचक करण्यात येणार आहेत. रविवारी (दि.23) सकाळी 8 ते 12 या वेळेत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या स्वछता अभियानामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे 5000 हुन अधिक स्वयंसेवक, सेवादल, अनुयायी सहभागी होणार आहेत. अशी माहिती संत निरंकारी मंडळ पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली आहे.

संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी आपल्या जन्मदिवशी सार्वजनिक ठिकाणी स्वछता अभियान, वृक्षारोपण करावे असा आदेश दिला होता. या दिवशी संपूर्ण भारतामधील 1166 हुन अधिक रुग्णालय व उद्यान स्वच्छ होणार आहेत.

या स्वच्छता अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील वाय.सी.एम. रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, निगडी, पौड, हडपसर, पाषाण, सासवड येथील सरकारी रुग्णालये, रेवूड पार्क पार्क लोणावळा अशा 35 रुग्णालय व उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे. या सामाजिक उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा व आपले शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहन ताराचंद करमचंदानी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.