Vadgaon Maval : वटपौर्णिमेनिमित्त तुळशीच्या 150 रोपांचे वाटप

एमपीसी न्यूज- वटपौर्णिमेचे औचित्य साधुन नगरसेविका पूजा विशाल वहिले याच्यातर्फे वटपूजन करण्यासाठी आलेल्या महिलांना तुळशीच्या 150 रोपाचे. वाटप करण्यात आले.

वडगाव मावळ येथील खंडोबा मंदिर चौकात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नगरसेविका पूजा वहिले व पूनम जाधव याच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. सण साजरा करून आपली संस्कृती टिकवण्याबरोबर निसर्गाची जपणूक व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे नगरसेविका पूजा वहिले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.