Vadgaon Maval : बंदिस्त गटाराच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ०6 मधील नगरसेविका पूजा वहिले यांच्या प्रयत्नातून फ्रेंन्ड्स बेकरी ते रेल्वे लाईन बंदिस्त गटाराच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कामासाठी सुमारे 11 लाख 98 हजार रूपये खर्च येणार आहे.

या कार्यक्रमाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, सुभाषराव जाधव, पोपटराव वहिले, तुकाराम ढोरे, मंगेश ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, चंद्रजीत वाघमारे, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, सायली म्हाळसकर आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुधीर वहिले, सुनील शिंदे, अमर चव्हाण, आफताब सय्यद, संजीव सुळे, चंद्रकांत ठोंबरे, रामचंद्र हुलावळे, अतुल राऊत, मंगेश खैरे, सचिन ढोरे, सुहास वायकर, गणेश ढोरे, सुनील दंडेल, सतीश वाघेला, हिरामण जम, कुलदीप पाळेकर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.