Pimpri: भाजप नेते राजेश पिल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी अभीष्टचिंतन सोहळा

एमपीसी न्यूज – भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसवेक राजेश पिल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवारी)संध्याकाळी सात वाजता अजमेरा कॉलनीत अभीष्टचिंतन सोहळा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपचे नेते राजेश पिल्ले यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, शिवशक्ती महिला मंडळ अजमेरा-मासुळकर कॉलनी यांच्यावतीने अभीष्टचिंतन सोहळा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरीतील एस.एस. अजमेरा, अजमेरा कॉलनी येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सहकुटूंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.