Dehugaon : मित्राशी भांडण आणि शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून मित्राशी भांडण झाले. यावरून शिक्षकांनी त्याला पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिली. या रागातून 15 वर्षीय विद्यार्थ्याने दगडाच्या खाणीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास देहूगाव येथे घडली. मुलाचा मृतदेह एनडीआरएफ च्या मदतीने आज (बुधवारी) सकाळी बाहेर काढण्यात आला.

शुभम सुरवाले (वय 15, रा. चिंचोली, ता. मावळ) असे खाणीत उडी मारून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक दोन मध्ये शिकत होता. शाळेत त्याचे एका मित्रासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाची शिक्षा म्हणून शाळेतील शिक्षकांनी शुभमला पाच दिवस शाळेत न येण्याची ताकीद दिली. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर शुभम आपल्या मित्रांसोबत घरी जात होता. अचानक त्याने देहूगाव मधील दगडाच्या खाणीकडे जात असल्याचे मित्रांना सांगितले. तो एकटाच खाणीजवळ गेला आणि खाणीत उडी मारून आत्महत्या केली. एनडीआरएफ च्या मदतीने आज सकाळी शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.