Talegaon : डॉक्टर दाम्पत्याने फुलवली घराच्या बाल्कनीत शेती

एमपीसी न्यूज- शेतीविषयी प्रचंड ओढ असलेल्या एका दंत वैद्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळतानाच आपल्या घराच्या बाल्कनीत अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फुलझाडे, औषधी वनस्पती फुलवून त्यांनी आपल्या बाल्कनीचे रूपांतर हिरव्यागार शेतीमध्ये केले आहे. त्यांची ही बाग तळेगावकर नागरिकांसाठी आकर्षण ठरली आहे.

मावळ तालुक्यावर निसर्गाचा वरदहस्त आहे. त्यामुळे या परिसरात आपले सेकंड डेस्टिनेशन असावे अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे या ठिकाणी राहण्यासाठी पसंती दिली जाते. मात्र त्यातून या हिरव्यागार निसर्गाचे झपाट्याने सिमेंटच्या जंगलात रूपांतर होत आहे. परंतु शेती विषयी प्रचंड ओढ असलेल्या तळेगाव येथील डॉ. राजेंद्र देशमुख आणि डॉ. पौर्णिमा देशमुख या डॉक्टर दाम्पत्याने आपल्या घराच्या बाल्कनीत हिरवीगार बाग फुलवली आहे.

डॉ. देशमुख हे येथील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ असून मूळचे ते शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे आई वडील आजही बागायती शेती करतात.डॉ. देशमुख यांनी आपल्या या बागेमध्ये विविध प्रकारच्या फुलरोपांसह फळझाडे देखील बहरली आहेत. डॉ. पौर्णिमा देशमुख यांनी किचन व्हेजिटेबल गार्डन संकल्पनेतून या बागेत मिरची, वेलची, मिनी टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, अळू, गवतीचहा, पालक, लिंबू, गुलाब, जरबेरा, जास्वंद, लिली, मधूमालती, नागवेल,तुळस, कडीपत्ता, ब्रह्मकमळ, जुई, मोगरा, रातराणी, शोभेची अनेक झाडे डुलत आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ. देशमुख यांच्या या बागेमध्ये भारतीय पौराणिक कथा काव्यातून देवफूल म्हणून ज्याचा उल्लेख आहे ते पांढरेशुभ्र ब्रह्मकमळ फुलले होते. वटपौर्णिमेच्या रात्री वेलीवरील कळ्या उमलून सुमारे 90 ते 120 मिली मीटर व्यासाची तीन शुभ्र ब्रह्मकमळे फुलली होती.

ही हिरवीगार बाग पाहून पक्ष्यांना त्याचे आकर्षण वाटले नाही तरच नवल ! डॉ. देशमुख यांनी बागेत एक छोटासा प्रयत्न म्हणून बाल्कनीत एक छिद्र असलेले मडके झाकण लावून अडकवले व काही दिवसांत त्यात एक काळ्या चिमणीच्या जोडप्याने घरटे केले. आठ दिवसांत त्यामधून बारीक किलबिलाट ऐकू येऊ लागला. त्यात चार गोंडस पिले दिसली आणि बाल्कनी चिमण्याच्या किलबिलाटाने भरून गेली आहे .

डॉक्टरी पैशातून येणार ताणतणाव हलका करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. त्यांची मुले प्रद्योत (वय 9 वर्षे) आणि देवश्री (2 वर्षे ) यांना देखील आतापासूनच या झाडाफुलांची आवड झाली असून मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ही बाग मोलाची ठरत असल्याचे डॉ. पौर्णिमा यांनी सांगितले.

"Dr

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.