Katvi Maval : गावाच्या विकासासाठीच राजकारणात प्रवेश – श्रीधर चव्हाण

वडगाव कातवी नगरपंचायत सदस्य पदाचे उमेदवार श्रीधर चव्हाण यांचे मत
 
एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. विविध विकासकामे कातवीकारांपासून दूर राहिली आहेत. आता कातवीचा विकास करायचा आहे. विविध समस्या अजूनही कातवीत दबा धरून आहेत. त्यांना बाहेर काढत विकास साधण्यासाठीच मी राजकारणात प्रवेश केला असून प्रभाग क्रमांक दोन मधून नगरपंचायत सदस्य पदाची निवडणूक लढवीत आहे. अशी माहिती वडगाव कातवी नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोनचे भाजप पुरस्कृत उमेदवार श्रीधर धर्मनाथ चव्हाण यांनी दिली. आता एकच ध्यास, गावाचा विकास हा नारा घेऊन लोकांसमोर जात असून दिलेला शब्द पाळणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
 
प्रभाग क्रमांक दोनमध्ये वडगाव मधील केशवनगरचा काही भाग आणि कातवी हा भाग येतो. श्रीधर चव्हाण हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून भाजप पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवीत आहेत. त्यांना टीव्ही (दूरदर्शन) हे चिन्ह मिळाले आहे. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून घरात धार्मिक वातावरण आहे. त्यांचे वडील ह भ प धर्मनाथ कोंडीबा चव्हाण हे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांचे  संप्रदाय आणि सामाजिक क्षेत्रातील काम पंचक्रोशीत प्रशंसनीय आहे. तोच सामाजिक आणि धार्मिक क्षेत्राचा वारसा आणि गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याने निवडणूक लढवीत आहेत.
 
यापूर्वी ग्रामस्थांनी एमआयडीसीकडून लाईट आणली. त्यासाठी आंदोलन केले. चाकण महामार्गालगत कातवीसाठीच्या सर्व्हिस रोडसाठी आंदोलने केली. एमआयडीसीकडून तो मंजूर करून त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून त्याला पूर्णत्वास नेले. स्मशानभूमीसाठी संभाजी घुले यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी एक गुंठा जागा आणि जगन्नाथ चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण आणि मुरलीधर चव्हाण यांच्याकडून एक गुंठा असे एकूण दोन गुंठे जमीन ग्रामपंचायतीच्या नावे बक्षीसपत्राद्वारे लिहून घेतली आहे. हनुमान मंदिर ते शाळेपर्यंतचा रस्ता रांका डेव्हलपर्सच्या सहकार्याने तयार केला, असे नाथा घुले म्हणाले. गावातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानानंतर राजकीय क्षेत्रातून समाजसेवा करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाथा घुले म्हणाले, प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. परंतु तो उमेदवार सध्या श्री पोटोबा महाराज विकास आघाडीकडून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र मतदान आणि सदस्य पदासाठी स्वतंत्र मतदान करायचे आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार असून सदस्य पदासाठी श्रीधर चव्हाण (टीव्ही दूरदर्शन) यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी लोकांमध्ये समन्वय साधला जात आहे. मागील पाच वर्षात गावातील उमेदवार नसल्याने गावातील बरीच कामे रखडली आहेत. आता गावातील उमेदवार असल्याने कातवीकरांमध्ये उत्साह भरला आहे. कामे मजूर होऊन देखील रखडली आहेत. ती कामे प्राथमिकतेने पूर्ण करण्यात येतील.
येत्या पाच वर्षात कोणती कामे करणार –
# प्रत्येक वाडी, वस्तीत स्वतंत्र पाईप लाईन व पाणी फिल्टर बसविणे
# गावात अंतर्गत सिमेंट काँक्रेटचे रस्ते
# स्मशानभूमी
# गायरानातील घरे कायम स्वरूप बनविणे
# अंतर्गत गटारी
# सार्वजनिक शौचालय
# घरकुल योजना
# बचतगटातून आर्थिक समृद्धी
# शाळेसाठी नवीन इमारत
# शितळादेवी मंदिर सुशोभीकरण
# समाज मंदिर सुशोभीकरण
# व्यायामशाळा व सभामंडप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.