Pune : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘च्या अध्यक्षपदी अमृता देवगावकर

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘च्या अध्यक्षपदी अमृता देवगावकर यांची निवड करण्यात आली. नुकताच रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.

नूतन अध्यक्ष म्हणून अमृता देवगावकर, सचिवपदी पद्मजा जोशी यांचा शपथविधी झाला. यावेळी प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, सह प्रांतपाल पराग मुळे मावळते अध्यक्ष गणेश जाधव, डॉ. सुधीर राशिंगकर, दिलीप कुंभोजकर, मनीष धोत्रे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.