मुख्यमंत्री साहेब, डोन्ट अंडर इस्टिमेट पॉवर ऑफ सदाशिव पेठ

एमपीसी न्यूज – ”डोन्ट अंडर इस्टिमेट पॉवर ऑफ सदाशिव पेठ”, असे म्हणत सदाशिव पेठेतील पुणेकरांनी आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी पाठवले. कारण होते महापालिका निवडणुकीसाठीची जाहीर सभा. ते ही भर दुपारी 2.30 वाजता पुण्यातील हृदय स्थान म्हणतात तिथे! अखेरीस मुख्यमंत्र्यांची जहीर सभा रद्द… अन् सोशल मीडियावर पुणेरी चुटकूलांचा पाऊस सुरू…

बाजीरावचा बेटा जरी भाषणाला आला असता, तरी 1 ते 4 नाय नो नेव्हर! 
खुर्च्यांवर बसलेले पुणेकर दिसले नाही याला म्हणतात पारदर्शक मतदार, 

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!
अब की बार
कुणाचेही सरकार
इथे दुपारी झोपतो मतदार.
नवीन पुणेरी पाटी ????????????

मुख्यमंत्री म्हणतात – सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या  ????????????

मुख्यमंत्र्यांच्या सभेला ‘पारदर्शक’ गर्दी
पुण्यात, तेही सदाशिव पेठेत, दुपारी 1 ते 4 मध्ये सभा? कल्पनाच करवत नाही.

याला म्हणतात ‘हात दाखवून अवलक्षण’. एक तर ते पुणं, त्यात सदाशिव पेठ टिळक रोड आणि वर दुपारी तीन वाजता! ही मुभा तर पेशव्यांनाही नाही!!

मुख्यमंत्र्यांची दुपारी एकची सभा रद्द… कोणीही जमलं नाही सभेला…अरे… 1 ते 4 पुणे बंद असत…मग तिकडे मुख्यमंत्रीही असो….. पुणेरी बाणा शेवटी तो… याला म्हणतात नियम तो नियम…

तरी बरं मुख्यमंत्री सभाच घ्यायला गेले… चितळेंकडे बाकरवडी घ्यायला गेले नाहीत…

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज 2 वाजता सदाशिव पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, भर दुपारी या सभेला भाजपचे कार्यकर्तेच अनुपस्थित होते. तसेच सर्वसामान्य श्रोत्यांनीही पाठ फिरवली. पुण्यातील हृदय स्थानी भर दुपारी जाहीर सभा घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण पाहणे असाच प्रकार. दुपारी एक ते चार पुणे बंद असते. ती येथील लोकांची झोपण्याची वेळ, असा साधारण एक अलिखित नियम आहे. काहीही झाले तरी आम्ही तो बदलणार नाही, याचाच प्रत्यय आज दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला. अन् शेवटी सभा रद्द करून पिंपरी-चिंचवडकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर सोशल मीडियावर पुणेरी चुटकूल्यांचा असा अक्षरशः पाऊस पडला.  

पुणे आता बदललय. ते आता बहुसांस्कृतिक शहर झाले आहे. त्यामुळे इथे मुळचे पुणेकर कमी व बाहेरून येऊन स्थायिक होणा-यांची संख्या जास्त आणि दुपारी 1 ते 4 पुणे झोपते ही आता फक्त एक म्हण उरली आहे. ते आता कालबाह्य झाले आहे. अशा अटकळी बांधून केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत आहे. म्हणून भर दुपारी उन्हाचा चटका बसत असताना नागरिकांना सभेला बोलवायचे. हे अतीच झाले. त्यामुळे यांना समजायलाच हवे. कळायला हवे की या पेठा आहेत इथे मुळचा पुणेकर असो की बाहेरून येणारा 1 ते 4 बंद म्हणजे बंद तो नियम प्रत्यक्ष पेशवा जरी अवतरले तरी त्यांनाही लागू! मग तुमची काय बिशाद! असे मनाशी ठरवत नागरिक सोडा पण स्वतः भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सभेला दांडी मारली. 

पुण्यातील लोकांची ही मानसिकता माहित असताना भर दुपारी तेही पेठ परिसरात मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्याची शक्कल ज्याच्या डोक्यातून आली व ज्या-ज्या नेत्यांनी ही सभा आयोजित केली. त्यांचे आता काय होणार हे पाहणेही मनोरंजक ठरेल. तसेच या घटनेतून बोध घेऊन मतदारांना गृहीत धरू नये… हा धडा मुख्यमंत्र्यांसकट भाजपच्या सर्वच नेत्यांनी घेतला. हे निश्चित. 

चूक उमगल्याचे मुख्यमंत्र्यांच्या पिंपरीतील सभेच्या भाषणातून स्पष्ट

रिकाम्या खुर्च्या पाहून पावले माघारी फिरवण्याची वेळ आल्यानंतर वेळेचे समन्वय साधण्यात गडबड झाल्याने मी पुण्यातील सभा रद्द करून पिंपरी येथील सभेला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून जाहीर केले. आणि तात्काळ पिंपरीला पोहोचले. 

तिथे त्यांनी भाषणाची सुरुवातच, जोपर्यंत नेते दुपारच्या वेळी इतक्या उन्हात येत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही.   या निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडची जनता सावलीत जाईल, अशा शद्बात केली. त्यामुळे पुणेकरांना आपण भर उन्हात बोलवून चूक केली. ती आपल्याला उमगली आहे, अशी जणू काही कबुलीच त्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.