मुख्यमंत्र्याच्या पुण्यातील सभेसारखी सभा उभ्या महाराष्ट्राने इतिहासात पाहिली नसेल – शरद पवार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्र्यांची आज पुण्यात प्रचंड मोठी सभा झाली, उभ्या महाराष्ट्राने अशी सभा पाहिली नसेल. कारण त्यांच्या सभेला लोक नाही तर मुखंयमंत्री स्वतःच वाटबघत बसले होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगवी येथील जाहीर सभेत केली.  

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात  प्रभाग क्रमांक 29, 30, 31 आणि 32 या तीन प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) सांगवी येथील सभेत पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे, माजी रंगनाथ फुगे, नाना काटे, अतुल शितोळे,  ज्योती ढोरे,  सुषमा तनपुरे, पंकज  कांबळे आदी उपस्थित होते.
 

पवार म्हणाले की, पुण्यात मुख्यमंत्र्यांची प्रचंड मोठी सभा झाली. उभ्या महाराष्ट्राने इतिहासात अशी सभा पाहिलेली नाही.  आता येतील मग येतील म्हणून मुंख्यमंत्रीच वाट बघून कंटाळून गेले. मी ही अशी आत्तापर्यंत 50 वर्षात मुख्यमंत्र्यांची सभा पाहिली नव्हती.  ते स्टेजजवळ आले 5 मिनिट झाले 10 मिनिट झाले 15 मिनिट झाले 20 मिनिट झाले तरी आलेच नाहीत. कारण कुणी दिसेना म्हणून गिरीश बापट यांना त्यांनी सांगितले तुम्ही बोला आणि ते पिंपरीकडे आले. पिंपरीत पण त्यांना चिंता, कारण आधीच एक सभा रद्द झाली होती आता दुसरी सभा ही आजची रद्द होऊ नये, म्हणून लोकांना बोलावून बोलावून बसवले आणि म्हणाले माझी अब्रु वाचवा. अशा तर यांच्या इतिहास गाजवणाऱ्या सभा. त्यांच्या या आधीही पुणे व पिंपरी-चिंचवड मधील सभा रद्द झाल्या होत्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

जे गेले त्यांना जाताना मीही बघितले होते

 जे गेले ते जात होते त्यांना जाताना मी ही पाहिले. विचरले का रे बाबा जातो तर म्हणाले शास्तीकराचा प्रश्न मार्गी लागत नाही आम्ही तिकडे गेलो तर तो मार्गी लागेल. म्हटल जा बाबा. पण सत्तेत असताना दादा चांगला आमचा दादाही भोळा जो त्यांना पदे देत होता. मात्र, आता तिकडे गेले की दादा वाईट. मात्र, असो याचा पक्षाला काही फरक पडणार नाही. कामे चालूच राहतील.  

दिल्लीतही पिंपरी-चिंचवडचे नाव निघते

माझ्या आयुष्यातील पहिली लोकसभा निवडणूक  या मतदार संघातून लढली. आता अलीकडील काळात मी या निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झालो. मात्र, गेल्या पन्नास वर्षात मला काही तुम्ही सुट्टी दिलेली नाही. कामाच्या बाबती काही कमतरता नाही. शहरात प्रचंड विकास व बदल झाला आहे. नागरी विकास कसा करायचा या बद्दल दिल्लीत चर्चा केली तर तुम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये जाऊन बघा असे बोलले जाते. 

शिल्लक राहणा-या कामाचीही पूर्तता करायची आहे. कारण उद्योग इथे मात्र राहायला पुण्यात, असे होता कामा नये. लोक रहायलाही इथेच आले पाहिजेत.  पुण्यातील लोक जसे पुणे दाखवतात तसे पिंपरी-चिंचवडही दाखवतात. विकास काय बघायचे असेल तर पिंपरी-चिंचवडला चला असा आगत्याने सांगितले जाते. अण्णासाहेब मगर जेव्हा महापौर होते तेव्हा हे अनेक खेड्याचे गाव होते, मात्र आता कळतच नाही, शहरात प्रचंड बदल झाला, याचे महत्वाचे कारण दिलेल्या  सत्तेचा योग्य वापर. त्यामुळेच शहराचा एवढा विकास साधता आला, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

नागपूरची माणसे चांगली पण नेतृत्व नाही

मुख्यमंत्री म्हणतात मी सध्या संयुक्त महाराष्ट्राचा आहे. म्हणजे उद्या पद गेले की हे महाराष्ट्राचे तुकडे करायला मोकळे. मराठी ही मातृभाषा असणा-या राज्याचे हे दोन तुकडे करणार आहेत. ज्या राज्याच्या ऐक्यासाठी 109 हुतात्म्यांनी  रक्त गाळले. पण तुमच्या नेत्यांत दम नाही, ती  कुवत नाही. यांच्या हातून राज्याची जपणूक केली जाणार नाही. महाराष्ट्र एकसंध ठेवणे यांना शक्य नाही. हे नेते नागपूरला जाऊन सांगतात पिंपरी-चिंचवड, रांजणगाव येथे कंपनी आहेत, अरे तुमच्या नेत्यातच दम नाही तर कसे येणार तुमच्याकडे उद्योगधंदे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तुम्ही मला खूप दिलं आता माझी देण्याची वेळ

1984 साली आणीबाणीनंतरही तुम्ही मला दिले, मुखमंत्रीपद  4 वेळा दिले, संरक्षण मंत्री पदही दिले, कृषीखाते दिले. अशी 50 वर्ष तुम्ही सत्त्यातने मला निवडून दिले, तुम्ही लोक पाठीमागे उभे आहेत म्हणून शक्य झाले. आता मला द्यायचं आहे तुम्हाला. ते मला देण्यासाठी इथे असलेल्या  माझ्या लोकांना पाठबळ द्या. ते तुम्हाला भरभरून देतील, असे आश्वासन  शरद पवार यांनी दिले. 

57 अभियांत्रिकी कॉलेज असणारे पुणे विद्यापीठ हे देशभरातील एकमेव विद्यापीठ

पुणे परिसरात पुणे विद्यापीठ हे देशभरातील एकमेव विद्यापीठ आहे. ज्यामध्ये 57 इंजिनिअर कॉलेज आहेत येथे शिकलेले तरुण अनेक कारखान्यात काम करत आहेत . फक्त चार चाकी वाहन निर्माण करणाऱ्या कंपन्या 52 हजार लोकांना रोजगार देत आहेत. आता जग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. अमेरिकेतील अनेक महत्वाच्या घडामोडीचे विक्रम आपल्या परिसरातूनच होत आहे. ही अभिमानाची गोष्ट, असे कौतुकही पवार यांनी केले.

लोकांना रांगेत उभे करणारे आज त्यांनाच मते मागत आहेत

मोदी सरकारने नोटबंदी केल्याने लोक खूश असल्याचे सांगितले जातं आहे, लोकांना खूप आंनद झाल्याचे सांगितले होते, सुरुवातीला लोक तक्रार करत नव्हते. परंतु जेव्हा वारंवार लोकांना रांगेत उभे राहवे लागले, लोकांचे स्वतःचे पैसे काढण्यासाठी त्यांना मनस्ताप सहन करावा लागला तेव्हा त्यांना हा निर्णय फसल्याचे जाणवले. व तेच लोक आज नागरिकांना मत मागण्यासाठी जात आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.