पुण्यात मतदारांसाठी स्वंतत्र संकेतस्थळ तर पिंपरी-चिंचवडमध्ये तुर्तास पीडीएफचाच आधार

उद्यापर्यंत संकेतस्थळ सुरू करणार असल्याचा प्रशासानाचा दावा

एमपीसी न्यूज – मतदानाला अवघे चार दिवस राहिले असून मतदारांना माझे मतदान केंद्र कोणते किंवा मी मतदान करायला कोठे जाऊ अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुणे महापालिकेने स्वतंत्र संकेतस्थळच सुरू केले आहे. जिथे केवळ तुमचा मतदान क्रमांक किंवा नाव टाकले तरी  मतदाराला मतदानकेंद्र व बूथची माहिती मिळणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने संकेतस्थळावर सरळ पिडीएफ टाकल्याने नागरिकांना हजारो नावात त्यांची नावे शोधावी लागत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथेही पुण्याच्या मागे असल्याचे चित्र आहे.

यामध्ये पुणे महापालिकेने votersearch.punecorporation.org या संकेतस्थळावर  तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा नाव टाकले तरी तुम्हाला तुमचे मतदानकेंद्र कोठे व कोणते आहे याचा तपशील मिळेल. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये सारथी सारखी  सुविधा असतानाही केवळ राज्य निवडणूक आयोगाचे वोटर सर्च अॅप व महापालिका संकेतस्थळावर टाकलेल्या  पीडीएफचाच अधार आहे. यामध्ये पीडीएफ डाऊनलोड होणे किंवा त्या हजार नावात आपले नाव शोधणे, अशा अनेक अडचणींना मतदारांना सामोरे जावे लागत आहे.

याविषयी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संगणक व माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले की,  आम्ही त्या संकेतस्थळावर काम करत असून थोड्या वेगळ्या पद्धतीने संकेतस्थळ तयार करत असून उद्यापर्यंत त्याचे काम पूर्ण करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मात्र तोपर्यंत मतदारांना पीडीएफ व वोटर सर्च या मोबाईल अॅपचा आधार घ्यावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.