विद्यार्थ्यांच्या कल्पानांना चालना देण्यासाठी सायन्स पार्क येथे ‘इनोव्हेशन सेंटर’ ची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्क येथे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी रविवारी (दि.26) ‘इनोव्हेशन सेंटर’ ची स्थापना करण्यात आली.

सायन्स पार्क व भावसार व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमातून या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी नॅशनल केमीकल लायब्रोटरी इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख डॉ. प्रेमनाथ व्ही, शास्त्रज्ञ गायत्री क्षिरसागर , कलाजनसेटचे व्यवस्थापकीय संचालक मनोजजी फुटाणे, सायन्स पार्कचे प्रमुख प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, सिटी प्राईडचे प्रमुख डॉ. अभय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, भावसार व्हिजन अध्यक्ष प्रवीण फुटाणे आदी उपस्थित होते.

या इनोव्हेशन सेंटर अंतर्गत इयत्ता सहावी त नववीच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये  विज्ञानाविषयी विविध कार्यशाळेचे आयोजन  करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक कल्पना प्रकल्प यांना चालना देणे, सहकार्य करणे, विज्ञान विषयाबद्दल गोडी वाढावी, यासाठी  शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शिबिरे भरवणे, नवीन कल्पनांची, शोधाची नोंद घेऊन त्याचा समाजाला कसा फायदा होईल, यासाठी प्रयत्न करणे, तसेच नवीन कल्पनांचा शात्रोक्त पद्धतीचा अभ्यास करुन त्यांचे गस्त एवज किंवा कागदोपत्री पुर्तता करुन कल्पनेचे पेटंट करण्यासाठी प्रयत्न करणे अशे विविध उपक्रम याअंतर्गत राबवले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना चालना मिळावी, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे या उद्देशातून या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या स्थापना प्रसंगी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनीही आवर्जून हजेरी लावली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.