सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेएनयूची पुनरावृत्ती

मोर्चाला परवानगी नाकारल्याने एसएफआयच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी

एमपीसी न्यूज – देशातील विविध विद्यापीठातील असंतोषाचे लोन आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील पसरले आहे. शुक्रवारी (24 फेब्रुवारी) रात्री अभाविप आणि एसएफआय या विद्यार्थी संघटनामध्ये झालेल्या वादाचे पडसाद आता पुण्यात उमटताना दिसत आहे. आज एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

शुक्रवारी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशव्दार ते मुख्य इमारतीपर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. परंतू कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. असे असतानाही एसएफआयच्या वतीने हा आदेश झुगारत दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विद्यापीठातील अनिकेत कँटीन परिसरात अभाविप आणि सरकारविरोधात जोरादार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

 

यावेळी झालेल्या निषेध सभेत विद्यार्थ्यांनी मोदी सरकार अभाविपच्या गुंडांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. आमदार प्रशांत परिचारिक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करणे या देशात गुन्हा आहे का. असा सवाल उपस्थित करीत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष संतोष शिंदे यांनी एसएफआय संघटनेला पाठिंबा जाहीर केला असून या पुढील काळात एसएफआयच्या प्रत्येक आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असेल, असे सांगितले. यापुढे अभाविपच्या गुंडानी आणि आरएसएसने या विद्यार्थ्यांना हात लावून दाखवावा मग आम्ही पाहून घेऊ असे सांगत त्यांनी अभाविपला आव्हान दिले.

 

एसएफआयचे महारुद्र डाके म्हणाले की, यापुढे आम्ही अभाविपच्या गुंडगिरीला घाबरणार नाही. विद्यापीठामध्ये कोणते पोस्टर लावायचे आणि कुठले नाही लावायचे याची परवानगी आम्हाला अभाविप आणि आरएसएसकडून घ्यावी लागणार का? असा सवाल उपस्थित करित निषेध व्यक्त केला.

"uni"

"uni

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.