हम्टी डम्टी स्कूल व सरस्वती कला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज   – पिंपरीतील हम्टी डम्टी स्कूल व सरस्वती कला विद्यालयाच्या वतीने घेतलेले  स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. त्यामध्ये 3 ते 14 वयोगटातील मुलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमामध्ये भारतीय परंपरेला अनुसरून बहारदार गाण्यांवर मुलांनी नृत्याविष्कार सादर केला.

 

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी  त्यांच्यातील उपजत कलागुणांचा सुरेख आविष्कार सादर करून रसिकांसह मान्यवरांना भारावून टाकले.  कार्यक्रमाची सुरुवात महागणपतीला नृत्यातून वंदन करुन झाली. यावेळी शशिकांत देशपांडे, प्रमोद काळे, फकीर जगदाळे, नथु यादव, गौरी देशपांडे, प्रसन्ना देशपांडे, प्रशांत कुमार आदी उपस्थित होते. 

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक असे नृत्य सादर केले. त्यात कथक, सरस्वती वंदना व भरतनाट्यम यावर नृत्य केले. तर ही गुलाबी हवा, हिरवा निसर्ग यावर नृत्य केले. तर नॉन स्टॉप हर किसीको, शोला जो भडके, ओ मेरी जान या गाण्यांवर डान्स केला.

"humti

"humti

"humti

"humti

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.