मावळ तालुका काँग्रेस अध्यक्षपदी बाळासाहेब ढोरे

एमपीसी न्यूज – काँग्रेस मावळ तालुकाध्यपदी बाळासाहेब ढोरे यांची निवड करण्यात आली असून, त्यांना  जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांनी निवडीचे पत्र दिले.



यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम नरवडे, अॅड. खंडूजी तिकोणे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, युवक अध्यक्ष गणेश काजळे, सिद्धेश ढोरे, रोहिदास वाळुंज, मयुर ढोरे, प्रवीण ढोरे, बाळकृष्ण पोटवडे आदी उपस्थित होते. ढोरे यांचे पक्षातील कार्य, तळमळ, निष्ठा, पक्षसंघटन पाहून त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली असल्याचे जगताप यांनी निवड पत्रात म्हटले आहे.

बाळासाहेब ढोरे यापूर्वी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व मावळ तालुका कार्याध्यक्षपदी कार्यरत होते. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले सात वर्षे पक्षाची बांधणी नाही. काँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत मात्र संघटन नाही. म्हणून संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आणि जुन्या नव्यांचा मेळ घालून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करणार व नव्याने पक्षबांधणी करू. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.