पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिवसेना गटनेतेपदी शहरप्रमुख राहुल कलाटे यांची निवड झाली आहे.

 

शिवसेनेच्या नवनिर्वाचित नऊ नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिवसेना गटनेतेपदी राहुल कलाटे यांची निवड केली.

 

राहुल कलाटे पिंपरी-चिंचवडचे शहरप्रमुख आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून लक्ष्मण जगताप यांना आव्हान देत दुस-या क्रमाकांची मते मिळविली होती. यापूर्वी कलाटे यांचे वडील व आई यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे.

 

भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, धनंयज आल्हाट यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातील आकुर्डी, निगडी परिसरातून शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आकुर्डीत जाहीर सभा झाली होती. त्याचा शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी फायदा झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगावातील प्रभागातून फक्त दोनच उमेदवार निवडून आले आहेत.

 

राहुल कलाटे यांनी स्वत:च्या पॅनेलमधील तीन उमेदवार निवडून आणले आहेत. त्यांच्यासमोर विरोधी पक्षाने कडवे आव्हान निर्माण केले होते. पिंपरी-चिंचवडमधील 128 जागांपैकी शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले आहे. त्याउलट कलाटे यांनी विरोधकांवर मात करत स्वत:सह पॅनलमधील इतर दोघांना निवडून आणले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.