पिंपरीत सोमवारी एकदिवसीय अखिल भारतीय स्त्री साहित्य-कला संमेलन

एमपीसी न्यूज – स्वानंद महिला संस्था, पिंपरी-चिंचवड व  ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला विभाग यांच्या वतीने पिंपरी येथे यंदाचे एकदिवसीय अखिल भारतीय 12 वे स्त्री साहित्य-कला या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या स्त्रियांनाही यावेळी गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ठ महिला पत्रकार म्हणून एमपीसी न्यूजच्या स्मिता जोशी यांना, तर स्वानंद महिला भूषण पुरस्कार डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, उद्योजिका कमला साबद्रा यांना जाहीर झाला आहे, तर स्वानंदा कतृत्वदक्ष माता पुरस्कार समाजसेविका रंजना लुणावत, गृहिणी पानकुंवर कटारीया यांना तर स्वानंद कर्तृत्ववान महिला पुरस्कार दुरदर्शनच्या उपसंचालिका रत्ना चॅटर्जी, नगरसेविका मनीषा चोरबोले यांना जाहीर करण्यात आला आहे. स्वानंद साहित्य रत्न पुरस्काराने पुणे आकाशवाणीच्या प्रतिमा जगताप यांना गौरविण्यात येणार आहे.

 

तसेच यावेळी शिक्षण महर्षी कै. शंकरलाल मुथा यांच्या चरित्रावर अधारित सिडीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याबरोबरच स्वर्गीय चंदनलाल दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ संस्था पुरस्कारातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी पुरस्कार पी.एच. डायग्नोस्टिक सेंटर यांना, भारतरत्न इंदिरा गांधी पुरस्कार पुण्यातील जया आनंद या संस्थेला,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दौंड येथील अविश्री बाल सदन यांना, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार निगडीतील ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक विभाग, स्वानंद आदर्श माता पुरस्कार आशा लुकंड यांना प्रदान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.