पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लुने एका महिलेचा मृत्यू ; आठ दिवसात तिघांचा बळी

एमपीसी न्यूज – भोसरी येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लुने एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसात स्वाइन फ्लयुने तिसरा बळी घेतला.

मोशी येथील 54 वर्षीय महिलेवर भोसरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि.4) महिलेचा मृत्यू झाला.

गेल्या आठ दिवसात स्वाइन फ्लुने शहरातील तिसरा बळी घेतला आहे. पिंपळे गुरव येथील 50 वर्षीय महिलेचा बुधवारी (दि.1)  चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 28 फेब्रुवारीला एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

गेल्या काही दिवसात शहरात स्वाइन फ्लुच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. स्वाइन फ्लुची लस महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वाइन फ्लु रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून स्वाइन फ्लुच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. पाणी जास्त प्यावे”, असे आवाहन, वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

"advt"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.