शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

आळंदी पोलिसांतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

शालेय मुलांना पारितोषिकांचे वाटप

एमपीसी न्यूज –  आळंदी पोलीस ठाण्यातर्फे आयोजित विविध विषयावरील वक्तृत्व स्पर्धांमध्ये परिसरातील 6 शाळांच्या मुलांनी सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली.

पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या विशेष संकल्पातून विविध जिल्ह्यात या स्पर्धा उत्साहात झाल्या. डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे आळंदीत पोलीस ठाण्याच्या वतीने स्पर्धा घेण्यात आल्या.

 

यावेळी आळंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, मुख्याधिकारी संतोष टेंगले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील, शिरीष कारेकर, व्हि.टी. शिवले, मोहन पवळे, एम.डी.पानसरे, पी.एच.थिटे, एस.एल.बनकर, के.एम.घेनंद, डी.एन.नाईकडे यांच्यासह आळंदी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेत आळंदी परिसरातील सहा शाळांमधील मुलांनी भाग घेत स्पर्धा यशस्वी जिंकत पारितोषिके मिळवली. यात विविध विषयावर समाज प्रबोधन करणारी वक्तव्य करीत वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धक मुलांनी रंग भरला. अनेकांनी या स्पर्धेत भाग घेत वक्तृत्व स्पर्धा गाजवली. विविध विषयात जनजागृती करीत प्रभावी संभाषण कलेचे सादरीकरण करीत विजय मिळवला.

यावेळी व्यसन मुक्त जीवन, वाहतूक साक्षरता शिक्षण, अमली पदार्थाचा वाढता वापर, महिलांवर होणारे अत्याचार विषयक गुन्हे, आर्थिक कारणाने होणारे गुन्हे यावर आधारित विषयावर शालेय मुलांनी वक्तृत्व कलेचे सादरीकरण करीत स्पर्धा गाजवली. संभाषणाने उपस्थितांची उत्साही दाद मिळवत अखेर पारितोषिकेही मिळवली. अनेक गटातून मुलांनी 4 मिनिटांचे वक्तृत्व सादर केले. कमी वेळेत विषयाची मांडणी करीत मुलांनी उपस्थित प्रश्नांची उत्तरे देत परिक्षकांचीही दाद गुण मिळवत घेतली.

पहिला क्रमांक मरकळ येथील नवीन माध्यमिक स्कुलने तर दुसरा क्रमांक वडगाव घेनंद येथील शरदचंद्र पवार प्रशालेने मिळवला. या स्पर्धेतील सहभागी शालेय मुलांना उपस्थितांचे हस्ते पारितोषिके आणि गुलाब पुष्प देण्यात आले. स्पर्धेसाठी शालेय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांच्यासह 3 परिक्षकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आळंदी पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

spot_img
Latest news
Related news