अस्पत अ‍ॅकॅडमी, रेल्वे पोलीस, सेंट्रल रेल्वे यांची विजयी सलामी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धा 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत अस्पत अ‍ॅकॅडमी, रेल्वे पोलीस (पुणे) व सेंट्रल रेल्वे (पुणेविभाग) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत अस्पत अ‍ॅकॅडमी या संघांनी खडकी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचा 8-0 असा सहज पराभव केला. रेल्वे पोलीस (पुणे) संघाने हॉकी लव्हर्ससंघाचा 6-3 असा पराभव करून विजयी सलामी दिली. सेंट्रल रेल्वे पुणे विभाग संघाने ग्रीन मेडोज् संघाचा 9-2, असा एकतर्फी पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा निकालः अस्पत अ‍ॅकॅडमीः 8 (संजय पोल्लाय्या 13, 21, 35 मि., उमेश श्ररेनपाल 15, संजय महाबडी 23, 38 मि., मयूर ठाकूर 39 मि., प्रणव माने 48 मि.) वि.वि. खडकी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीः 0;


2) रेल्वेपोलीसः 6 (अमोल भोसले 7, 21 मि., चिराग माने 15, 17, 29, 48 मि.) वि.वि. हॉकी लव्हर्सः 3 (आकाश बेलवलकर 29, ओकार अंगीर 33 मि., निहाल गोराडकर 35 मि.);

 

 

3) सेंट्रल रेल्वे (पुणे विभाग) 9 (प्रकाश घुंब्रे 6 मि., भूषण ढेरे 26 मि., जितेंद्र सिंग 35, 40, 43 मि., राजीव भाटकर 44, 56 मि., भावेश भांडेकर 46 मि., ब्रायन रोझारिओ 58 मि.) वि.वि. ग्रीन मेडोज्ः 2 (भागवान वायवरे 41 मि., अभिषेक स्वामी 48 मि.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.