पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त एनएफएआयतर्फे शुक्रवारपासून महिला चित्रपट महोत्सव

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त एनएफएआय (राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय), आशय व आयाम क्रिएशनच्या संयुक्त विद्यमाने महिला चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव शुक्रवार (दि.10) ते रविवार (दि.12) या दरम्यान लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे थिएटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

मागील आठ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी महिलाविषयक एखादी थीम घेऊन त्यावर आधारित चित्रपट या महोत्सवासाठी निवडले जातात. यावर्षी ‘खेळ क्षेत्रातील महिला’ अशा विषयावर आधारित चित्रपट दाखवणार आहोत.

‘मिलियन डॉलर बेबी’  या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन आहे. तर समारोपाला मीरा नायरचा ‘ क्वीन ऑफ कॅटवे ‘ हा चित्रपट दाखविला जाणार आहे. इराणी दिग्दर्शक जाफर पनाहीचा ऑफसाइड हा चित्रपट महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.