सहा दुचाकींसह फरार असलेला आरोपी जेरबंद; एक अल्पवयीनही ताब्यात

एमपीसी न्यूज – सहकारनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यालाही ताब्यात घेतले. रोहित कांबळे असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या 14 वर्षीय सहका-याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील कर्मचा-यांना के. के. मार्केट येथील पार्किंगमध्ये संबंधित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून  3 होंडा अॅक्टिव्ह,1 टीव्हीएस ज्युपिटर, 2 मोटर बाईक अशा दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. मोरे, पोलीस हवालदार मोरे, सोनावणे, पोलीस शिपाई पिंगळे, कोंडे, इंगळे, चव्हाण, येवले, कोकणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.