तळेगावमध्ये धुळवडीच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’द्वारे तपासणी

एमपीसी न्यूज – धुळवड साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळेगाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. वाहनचालकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशीनव्दारे तपासणी करण्यात आली. 


तळेगाव दाभाडे येथील नागरिकांनी आज (सोमवारी) धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. धुळीवडीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तळेगाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. शहराच्या चौका-चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. वाहनचालकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशीनव्दारे तपासणी करण्यात आली. अद्यापर्यंत एकही मद्यपी चालक सापडला, नसल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. 

नाकाबंदी केली होती. चौका-चौकात वाहनचालकांना थांबवून त्यांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशीनव्दारे तपासणी करण्यात येत होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मद्य प्राषान करुन वाहन चालविणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही, पाटील यांनी सांगितले.
"talegaon
"talegaon
"talegaon

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.