भोसरीत पूर्ववैमनस्यातून टोळक्याची तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना आज (सोमवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरीतील शांतीनगर येथे घडली. 


मारहाण झालेल्यांची नावे अद्यापर्यंत समजू शकली नसून त्यांच्यावर पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांनी एका मुलाला, त्याचे वडील आणि मित्राला हाताने बेदम मारहाण केली आहे. एकाच्या नाकाला जबर मार लागला आहे. त्याच्या नाकामधून रक्तश्राव झाला आहे. त्यांच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरु आहेत. 

पूर्वी मुलांची भांडणे झाली होती. त्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी या तिघांना हाताने मारहाण करुन पसार झाले आहेत. हाताने मारहाण केली असून तलवार, कोयत्याने वार केले नसल्याचे, भोसरी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.