लोणावळा शहरात पाच कोटी रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामांचे भूमीपूजन

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात डिपीडीसीच्या माध्यमातून लोणावळा शहरातील तुंगार्ली विभागात गोल्ड व्हँली व जुना खंडाळा विभागात माहिमतुरा ते साधना कुटिर दरम्यानचे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ते डांबरीकरण कामाचे भूमीपूजन आज आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कुमार ऐलानी, नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन रस्त्याकरिता डीपीडीसी च्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

यावेळी मुख्याधिकारी सचिन पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, नगरसेवक राजु बच्चे, प्रमोद गायकवाड, भरत हारपुडे, निखिल कविश्वर, बाळासाहेब जाधव, देविदास कडू, सुधिर शिर्के, संजय घोणे, दिलीप दामोदरे, अंजना कडू, पुजा गायकवाड, सेजल परमार, बिंद्रा गणात्रा, रचना सिनकर, आरोही तळेगावकर, जयश्री आहेर, गौरी मावकर, अपर्णा बुटाला, सुर्वणा अकोलकर, मंदा सोनवणे, अरुण बेदे, विजय सिनकर, मुकेश परमार, अरुण लाड, हर्षल होगले, देवा दाभाडे आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार भेगडे म्हणाले लोणावळ्याची 34 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना देखील मंजुर झाली आहे. दोन महिन्यात नविन प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन होणार असून तेथे नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन तक्रार निवारणाला गती देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे तसेच शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते विकेंद्रीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे सांगत लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.