लोणावळ्यात काँग्रेसचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज – पंजाब राज्यात काँग्रेस पक्षाला मिळालेली एकहाती यश तसेच गोवा व मनिपुर राज्यांमध्ये काँग्रेसने मिळविलेली प्रथम क्रमांकाची मते याचा लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज पुतळा चौकात फटाके वाजवत व पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गवळी, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र दरेकर, मावळचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक निखिल कविश्वर, संजय घोणे, सुधिर शिर्के, गटनेत्या आरोही तळेगावकर, सुर्वणा अकोलकर, विलास विकारी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याणजी, राजु गवळी, सुबोध खंडेलवाल, बक्षी, रवी सलोजा, सुनिल मोगरे, सत्तार शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.