इनरव्हिल क्लब पिंपरीच्या वतीने रविवारी लहान मुलांतील अस्थिव्यंग तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – इनरव्हिल क्लब पिंपरी, माजी आमदार आण्णा बनसोडे आणि साई श्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलामधील अस्थिव्यंग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवारी (दि. 19) साई श्री हॉस्पिटल परिहार चौक, औंध येथे सकाळी 9 ते 1 या कालावधीत होणार आहे.

0 ते 17 या वयोगटासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून डॉ. मंदार आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांची मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तसेच यात लहान मुलांमघील जन्मजात व्यंग, हाडातील/ सांध्यातील जंतूसंसर्ग, संधिवात, पोलिओ, सेरेब्रल पाल्सी, वाढत्या मुलांचे आजार याची तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी 020-27298686 (20 लाईन्स) आणि 9689930608 या क्रमांकावर नावनोंदणीसाठी संपर्क साधावा अणि गरीब व गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.