दिघीत पाण्याच्या टाकीत बुडून साडेतीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत बुडून एका साडेतीन वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी)  दिघी येथे दुपारी घडली.

सुमित अनिल चौहान, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिघीत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सुमित हा खेळत असताना तो या बांधकाम साईटच्या पाण्याच्या टाकीत पडला. बराच वेळ तो दिसला नाही. त्यामुळे त्याचा आसपासच्या परिसरात शोध घेतला.

या दरम्यान सुमित या पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसून आले. उपचाराकरिता त्याला वायसीएम रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याच बांधकाम साईटवर या मुलाचे पालक काम करत असल्याचे समजते. दिघी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.