‘डिपेक्स’मध्ये अवतरली अॅडॉप्टिव्ह कंट्रोल गाडी ते फिरते पूल; नावीन्यपूर्ण प्रकल्प

एमपीसी न्यूज – अपघातात जाणारे हजारो जीव वाचविण्यापासून ते शेतक-यांसाठी पिकाला कधी व कसे पाणी द्यावे, एकाच ठिकाणी सर्व वाहतूक मार्गांचा मिलाप असणारा पूल कसा उभारावा इथपर्यंत सर्वच आधुनिक गोष्टींची जत्राच ‘डिपेक्स’च्या माध्यमातून पिंपरी येथे भरली आहे.

 

पिंपरीतील, एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या 28 व्या राज्यस्तरीय चारदिवसीय ‘डिपेक्स’ प्रदर्शनला शुक्रवार (दि.17) पासून सुरुवात झाली आहे. विविध आधुनिक प्रकल्प, औषधफवारणीचे एअर क्राफ्ट, स्मार्ट ग्रीन ब्रिज मॉडेल असे एक ना अनेक प्रकल्प ‘डिपेक्स’ प्रदर्शनामध्ये आहेत.

 

यामध्ये गोवा आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 1 हजार 100 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात 260 प्रकल्प आहेत. वाहन, उद्योगक्षेत्राबरोबरच, शेती, पर्यावरणपूरक, उर्जा इंधन आदी विविध क्षेत्राशी निगडीत असे शेकडो प्रकल्प प्रदर्शनात आहेत. दैनंदिन जीवन अधिक सहज आणि सुकर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उत्कृष्ठ प्रकल्प तयार केले आहेत. प्रकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी प्रकल्प पाहण्यासाठी येत आहे. प्रकल्पाची माहिती जाणून घेत आहेत.

 

चालकाचे लक्ष नसल्यामुळे अनेकदा अपघात होतात. अपघात रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. रस्त्यावर एखादी व्यक्ती अचानक समोर आली आणि चालकाचे लक्ष्य नसले तरी ‘अल्ट्रासॉनिक’ सेन्सरमुळे थांबणारी मोटार विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. विवेक गोंदील, देवांक जोशी, आदित्य बडवे या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. यामुळे अपघात होणार नसल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा आहे.

 

ऑटोमॅटिक बॉटेल कॅप स्टॉपिगज मशिन, विमानतळावर बॅग शॉर्टिंग करणारे मशिन, जमीनीची सुपिकता कळण्यासाठी ‘पॅरामीटर मॉनेटअरिंग अॅन्ड कंट्रोल सिस्टीम’ असे विविध प्रकल्प ‘डिपेक्स’मध्ये आहेत. त्यामुळे वातावरण कसे ओळखायचे, पिकाची उंची कशी मोजायची याची माहिती मिळणार आहे. पिकाला काय पाहिजे आहे हे समजणार आहे.  यामुळे शेतक-यांचे कष्ट कमी होणार आहे. प्रकल्पाला तंत्रज्ञानाचीही जोड देण्यात आली आहे.

 

समुद्र, महामार्ग आणि रेल्वेरुळाचा संगम असेल तर तिथे बांधणारा फिरता पूल, नदी नाल्यातील घाण काढण्यासाठीचा ‘ड्रेन क्लिनर’, पायाच्या व्यायामासाठी रेकमबेन्ट ड्रायसायकल, आयलॅन्डिंग सिस्टीम असे शेकडो प्रकल्प प्रदर्शनात आहेत.

 

हे प्रदर्शन पिंपरी येथे येत्या सोमवारपर्यंत असणार आहे. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना, नागरिकांना या प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे.

"Dipex

"Dipex

"Dipex

"Dipex

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.